शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

‘हीच वेळ आहे...’ : गेल्या वर्षी जिल्ह्यात आढळले २ हजार ९४८ क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:07 IST

यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.

ठळक मुद्दे१९५२सालापासून बी.सी.जी लसीचा उपयोग‘टी.बी’ नोटीफाईड आजार

नाशिक : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकिय यंत्रण झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते. त्यापैकी २८ रुग्ण दगावले तर ९५ टक्के रुग्णांना उपचाराखाली आणण्यास यश आल्याचा दावा जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आला आहे.रॉबर्ट कोच यांनी २४ मार्च १८८२साली क्षयरोगाचा शोध लावला. मायकोबॅक्टरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जीवाणुमळे क्षयरोगाची लागण होते. हा आजार मुख्यत: हवेमार्फत पसरतो, असा निष्कर्ष कोच यांनी संशोधनातून लावला होता. त्यामुळे २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. १९५२सालापासून बी.सी.जी लसीचा उपयोग देशात केला जाऊ लागला. क्षयरोगाच्या रुग्णांचे नवीन व पुर्नउपचार घेणारे असे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले.जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४५ लाख लोकसंख्येसाठी सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीमार्फत हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत १६ क्षयरोग पथके, ७० मान्यताप्राप्त सुक्ष्मदर्शक केंद्र व १३८ शासकिय तथा अशासकीय आरोग्य संस्थाच्या सहकार्याने मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आढळून रुग्णांपैकी १हजार ५११ रूग्ण थुंकी दुषित क्षयरोगाचे तर ५७१ रु ग्ण थुंकी अदूषित क्षयरोगी आहेत. तसेच ३५८ रूग्ण हे पुनर्उपचार घेणारे व ५०८ अन्य अवयवांचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राकडून प्राप्त झाली आहे.‘‘हीच वेळ आहे’’यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.अशी आहेत क्षयरोगाची लक्षणेदोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला येणेसंध्याकाळी हलकासा ताप दररोज येणेभूक मंदावणे, वजन कमी होणेथुंकीतून रक्त पडणेछातीत वेदना होणेअशक्तपणा जाणवणे आणि रात्री घाम येणे.‘टी.बी’ नोटीफाईड आजारभारत सरकारने क्षयरोग (टी.बी) हा आजार ‘नोटीफायबल’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानूसार सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिकांना त्यांच्याकडून निदान करण्यात आलेल्या तसेच उपचार करत असलेल्या या आजाराच्या रूग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक