शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

रोमांचक सामना : पक्ष कोणतेही असले तरी लढत कोकाटे-वाजे अशीच होणार

By admin | Updated: July 25, 2014 00:39 IST

बहुरंगी राजकारणाची ‘दुरंगी’ वाटचाल

सिन्नर : गेल्या पाच वर्षांत सिन्नरच्या राजकारणात वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या असल्या तरी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरला दुरंगी लढत होईल, अशी स्थिती आहे. पक्षापेक्षा व्यक्तिभोवती पिंगा घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी गटा-तटाच्या राजकारणाला प्रारंभ केल्याने विधानसभेची निवडणूक बहुरंगी होण्यापेक्षा दुरंगी राहील, असे चित्र आहे. आमदार माणिकराव कोकाटे आणि जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे यांच्यातच रोमांचक लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
१५ आॅगस्टनंतर आचारसंहिता लागू होण्याचे संकेत मिळत असले तरी त्यापूर्वीच सिन्नरचे राजकीय वातावरण तापले आहे. वाजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोकाटे कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील याबाबत अजूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिवसेना-भाजपा युतीच्या संसारात सिन्नर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सिन्नरची जागा कॉँग्रेसकडे आहे. वाजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेकडून तेच उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वीच कोकाटे यांनी नाशिक येथे कॉँग्रेसच्या पक्ष निरीक्षकांना आपण विधानसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगून नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरले आहे. त्यातून त्यांनी पक्षबदलाचे संकेत दिल्याचेही मानले जात आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले कोकाटे आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा असल्या तरी त्यांचा पक्ष कोणताही असला तरी सामना मात्र वाजे यांच्यासोबतच होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व मनसे या पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मशागतीला प्रारंभ केला आहे. शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी तालुकाप्रमुख दिगंबर देशमुख, पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ व छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर इच्छुक आहेत. सिन्नरची जागा भाजपाला मिळावी यासाठी भाजपाचे नेते आग्रही आहेत. तालुकाध्यक्ष सुनील केकाण व भाऊसाहेब शिंदे यांनी निवडणूक लढविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा बोलून दाखविली आहे. आघाडीत बिघाडी झालीच तर बंडूनाना भाबड, कोंडाजीमामा आव्हाड किंवा अ‍ॅड. भगीरथ शिंदे यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीची तयारी आहे. मनसेकडून जयंत आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी कोकाटे व वाजे या दोन तगड्या उमेदवारांमध्येच सामना होईल, अशी चर्चा जोर धरूलागली आहे. त्यादृष्टीने कोकाटे व वाजे समर्थकांनी बांधबंदिस्ती सुरू केली आहे.
गत विधानसभा निवडणुकीनंतर ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते पाच वर्षे निष्ठेने पक्षाचे काम करीत होते. मात्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पक्षाची बंधने झुगारून व्यक्तिनिष्ठेला महत्त्व देत गटा-तटाच्या राजकारणाला प्रारंभ केल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिन्नरच्या राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ पाहत आहे.
वाजे यांच्या सेना प्रवेशापाठोपाठ त्यांचे अनेक समर्थक हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत. कोकाटे समर्थकांचीही तीच स्थिती आहे. ते जातील तिकडे त्यांचे समर्थक जातात. त्यामुळे आगामी निवडणूक व्यक्तिनिष्ठ असणार आहे हे नक्की.