नाशकात स्वाइन फ्लू बळींची संख्या तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:19 IST2019-03-16T01:18:22+5:302019-03-16T01:19:31+5:30

नाशिक शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, यंदा तीन महिन्यांत ५९ जणांना लागण झाली आहे, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.

Three of the victims of swine flu in Nashik | नाशकात स्वाइन फ्लू बळींची संख्या तीन

नाशकात स्वाइन फ्लू बळींची संख्या तीन

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, यंदा तीन महिन्यांत ५९ जणांना लागण झाली आहे, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्यावर्षी केवळ एका व्यक्तीला स्वाइन फ्लूची लागण झाली होती आणि त्याचा मृत्यू झाला होता. परंतु यंदा जानेवारी ते मार्च महिन्यापासून ५९ जणांना लागण झाली असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे जानेवारीत सात, फेब्रुवारीत ४०, तर आता मार्च महिन्यात १२ जणांना लागण झाली आहे.

Web Title: Three of the victims of swine flu in Nashik