दिंडोरी तालुक्यात पुन्हा तीन नवे रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 19:02 IST2020-06-25T19:02:15+5:302020-06-25T19:02:15+5:30

दिंडोरी : तालुक्यात आज पुन्हा तीन कोरोना रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून गेल्या नऊ दिवसापासून दररोज वाढणार्या रु ग्णांमुळे चिंता वाढत आहे. दरम्यान दिंडोरी शहरात सलग तिसर्या दिवशी जनता कर्फ्यु पाळण्यात आला.

Three new hospitals in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात पुन्हा तीन नवे रु ग्ण

दिंडोरी तालुक्यात पुन्हा तीन नवे रु ग्ण

ठळक मुद्देनागरिकांनी सतर्क राहत शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे असे आवाहन

दिंडोरी : तालुक्यात आज पुन्हा तीन कोरोना रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून गेल्या नऊ दिवसापासून दररोज वाढणार्या रु ग्णांमुळे चिंता वाढत आहे. दरम्यान दिंडोरी शहरात सलग तिसर्या दिवशी जनता कर्फ्यु पाळण्यात आला.
दिंडोरी येथील कपडे व्यापारी यांचे कुटुंबातील दोन महिलांचे रिपोर्ट पॉझििटव्ह आला असून अन्य संपर्कातील सहा व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर मोहाडी येथील एक 35 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझििटव्ह आला आहे. त्याचे संपर्कातील व्यक्तींना विलीगीकरन कक्षात पाठवण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहत शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Three new hospitals in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.