Three minors were taken into custody in the case of the hand-cut head | हात, शीर कापलेल्या त्या मृतदेह प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

हात, शीर कापलेल्या त्या मृतदेह प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

नाशिक : शहरातील  इंदिरानगर येथे आढळलेल्या हात व शीर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटवून हत्या करणाऱ्यांचा शोध घेण्यात इंदिरा नगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात  घेण्यात आले आहे. पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने
 बारा तासाच्या आत तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले

पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पडीत विहिरीत हात व शीर नसलेला मृतदेह काल सापडल्याने खळबळ उडाली होती पैशाची देवाण घेवाण वरून तीन अल्पवयीन मुलांनी खून केल्याने निष्पन्न झाल्याने या तीन अल्पवयीन मुलाना बारा तासाच्या आत पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे. 

Web Title: Three minors were taken into custody in the case of the hand-cut head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.