शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नाशिकमध्ये पाझर तलावात बुडून तीन बालिका ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:41 PM

तीघी जवळील एका पाझर तलावाजवळ खेळताना पाण्यात आंघोळीसाठी उतरल्या असता बुडाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.

ठळक मुद्देबेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्या गतप्राण बेंडकोळी कुटुंबावर आभाळ फाटले

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावाजवळील शिवाजीनगर पाझर तलावात बुडून बुधवारी (दि.१८) तीन बालिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपुर्ण शिवाजीनगर, साप्ते शिवारात शोककळा पसरली आहे.साप्ते गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवाजीनगर पाड्यावर राहणाऱ्या सोनू बेंडकोळी यांच्या मुली जिजा सोनू बेंडकोळी (९), धनश्री सोनू बेंडकोळी (७) तसेच स्वप्नीली यशवंत बेंडकोळी (५) या तीघी जवळील एका पाझर तलावाजवळ खेळताना पाण्यात आंघोळीसाठी उतरल्या असता बुडाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत गावातीलच अंगणवाडीत शिकणारी बालिकाही होती. या तीघी पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच त्या बालिकेने गावात येऊन आई-वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेत तीन्ही चिमुकलींचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती हरसूल पोलिसांना सरपंच राजू बेंडकोळी यांनी दिली. काही वेळेतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तीन्ही मृतदेहांचा पंचनामा करून हरसूल पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविले. यामध्ये बेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्या गतप्राण झाल्याने या कुटुंबावर आभाळ फाटले आहे. या दोन्ही बहीणी पेठ तालुक्यातील शासकिय आश्रमशाळेत शिकत होत्या. तसेच स्वप्नीली ही अंगणवाडिकेत अक्षरओळखचे धडे गिरवित होती. घटनेची माहिती मिळताच आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरAccidentअपघातPoliceपोलिस