कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने ४००कोंबड्या मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:40 IST2019-11-20T20:35:18+5:302019-11-20T20:40:01+5:30
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून ...

कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने ४००कोंबड्या मृत्यूमुखी
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ४००पेक्षा अधिक बॉयलर कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.
सिन्नर तालुक्यातील वावी येथील पोल्ट्री फार्ममधून ८०० बॉयलर कोंबड्या घेऊन ट्रक (एमएच ०३ सीपी ९९५४) हा बुधवारी (दि.२०) रात्री मुंबईला जाण्यास निघाला. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपनगरनाका दर्गा ओलांडून ट्रक काही अंतर पुढे गेला असता ट्रकला एका ट्रॅव्हलच्या लक्झरी बसने कट मारल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यामुळे ट्रकमधील जवळपास ४०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली हाती. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तत्काळ क्रेनच्या साह्याने उलटलेला ट्रक बाजूला करण्यात आला. मृत्यूमुखी पडलेल्या शेकडो कोंबड्या बुधवारी सकाळी मनपाच्या आरोग्य विभागाकडून उचलून भरून कचरा डेपोतील मृत जनावरांच्या विभागात पोहचविण्यात आल्या. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.