विनयभंग करून पिडितेला जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 13:52 IST2020-03-20T13:49:25+5:302020-03-20T13:52:14+5:30

गंगापूररोड परिसरात आनंदवल्ली बस स्टॉप ते आनंदवल्ली टेलीफोन आॅफीस मागच्या भागात संशयित आरोपी याने एका महिलेचा तिच्या मनाविरोधात पाठलाग करून विनभंग करीत लग्नाची मागणी घातली. यावेळी पीडीतेने नकार दिला असता गायकवाड याने फिर्यादीचे आई व भावास वाईट शिवीराळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

Threatens to kill the victim with disrespect | विनयभंग करून पिडितेला जीवे मारण्याची धमकी

विनयभंग करून पिडितेला जीवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देपाठलाग करून महिलेचा विनयभंगगंगापूर परिसरात एकाच दिवशी दोन घटना पिडितेच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी 

नाशिक : गंगापूर परिसरात एका महिलेचा विनयभंग करून संशयिताने पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
गंगापूररोड परिसरात आनंदवल्ली बस स्टॉप ते आनंदवल्ली टेलीफोन आॅफीस मागच्या भागात संशयित आरोपी जाधव मळ्यातील मनोज रामकिसन गायकवाड  (१८) याने एका महिलेचा तिच्या मनाविरोधात पाठलाग करून विनभंग करीत लग्नाची मागणी घातली. यावेळी पीडीतेने नकार दिला असता गायकवाड याने फिर्यादीचे आई व भावास वाईट शिवीराळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे पिडतेलाही लग्नाला होकार दिला नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. तर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. भूषण सतिलाल निकम या संशयिताने शिवाजीनगर परिसरात विराजपार्क येथे राहणाºया एका मुलीला हातवारे करून इशारे केले. तसेच शिट्टी वाजवून अणि पाठलाग करून विनंयभंग केला.  या प्रकरणी पिडित मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

Web Title: Threatens to kill the victim with disrespect