शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

देवळाली रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, निनावी पत्राने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 09:45 IST

पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी (17 फेब्रुवारी) देण्यात आली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा व रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन सतर्क झाले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी (17 फेब्रुवारी) देण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा व रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन सतर्क झाले.रेल्वे सुरक्षा पोलीसांनाही याबाबत आयुक्तालयाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

नाशिक : पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी (17 फेब्रुवारी) देण्यात आली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा व रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन सतर्क झाले. तत्काळ बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून रेल्वे स्थानकाचा परिसर श्वानांच्या सहाय्याने तपासण्यात आला.

याबाबत अधिकृत सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आयुक्तालयाला निनावी पत्र प्राप्त झाले. त्या पत्रात दोन दिवसांमध्ये देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी पत्रात देण्यात आली होती. यानुसार आयुक्तालयाकडून तातडीने बॉम्बशोधक नाशक पथकाला आदेश देण्यात आले. रविवारी हे पथक  देवळाली रेल्वे स्थानकात दुपारी दाखल झाले. तसेच रेल्वे सुरक्षा पोलिसांनाही याबाबत आयुक्तालयाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. पथकाकडून श्वानांमार्फत संपुर्ण परिसरात पिंजून काढण्यात आला. रेल्वे स्थानकावरील कचराकुंड्या, अडगळीच्या जागा धातुशोधक यंत्राद्वारे तपासण्यात आल्या. सुमारे तासाभरापेक्षा अधिक वेळ रेल्वे स्थानकाची तपासणी पथकाकडून सुरू होती; मात्र कोठेही कुठल्याहीप्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नसल्याचा खुलासा सुत्रांकडून करण्यात आला आहे. 

दरम्यान, याबाबत कुठलीही माहिती सैन्याला अधिकृतपणे मिळालेली नाही. देवळाली कॅम्प हा लष्करी छावनीचा परिसर असून याठिकाणी आर्टीलरी स्कूल हे भारतीय सैन्याचे अतिमहत्त्वाचे केंद्र आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली असून कुठल्याहीप्रकारे या पत्राकडे दुर्लक्ष न करता यंत्रणा सतर्क असून संपुर्ण रेल्वे स्थानकाचा परिसर पिंजून काढण्यात आला आहे. तसेच रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षाव्यवस्था वाढविली गेली आहे. जीआरपीचे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, मांगुलाल पारधी, शरद सोनवणे, आरपीएफचे गोकुळ चौधरी यांच्यासह बॉम्बशोधक नाशक पथकाने तपासणी मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी रेल्वेचे सहाय्यक स्टेशन मास्तर मनोज सिन्हा यांच्यासह आदि अधिकारी उपस्थित होते. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

धमकीचे निनावी पत्र जरी आयुक्तालयाला प्राप्त झाले असले तरीदेखील पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून देखील या पत्राची गंभीर दखल घेत तातडीने रेल्वे स्थानक परिसराची तपासणी बॉम्ब शोधक-नाशक पथकामार्फत रविवारी करण्यात आली. तसेच रेल्वे पोलिसांनाही सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

आंतरदेशीय पोस्टकार्ड द्वारे दोन ओळीचा मजकूर असलेले पत्र आयुक्तालायला प्राप्त झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून रेल्वे स्थानक बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासले. कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नये.

- रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नाशिक

टॅग्स :NashikनाशिकBombsस्फोटकेPoliceपोलिसrailwayरेल्वे