शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार विद्यार्थ्यांच्या समूहगानाने राष्टभक्तीचा जागर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:51 IST

शुक्रवारी सकाळी ९ वाजता झालेल्या या सामूहिक देशाभिमान राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रमात नाशिक शहरातील विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एका सुरात देशभक्तीपर गीत राष्ट्रगीत सादर केले. देशभक्तीपर समूहगान कार्यक्रमाचे यंदा पाचवे वर्षे होते

ठळक मुद्देझेप मंडळाचा उपक्रम : शहरातील शाळांचा सहभाग‘भारत हमको प्यारा है’ झेंडा गीत, ‘तू नव्या जगाची आशा’

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संस्कृतीच्या वृद्धीसाठी प्रसिद्ध संगीतकार लेखक कवी स्व. ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे यांना त्यांचे शतक महोत्सवी जन्मवर्षानिमित्त समर्पित म्हणून तपोवनातील स्वामीनारायण स्कूलसमोर असलेल्या लंडन पॅलेस येथे हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी ‘जागवू या मुलांचा देशाभिमान गाऊन’ राष्ट्रभक्तीपर समूहगान करून राष्टÑभक्तीचा जागर केला.शुक्रवारी सकाळी ९ वाजता झालेल्या या सामूहिक देशाभिमान राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रमात नाशिक शहरातील विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एका सुरात देशभक्तीपर गीत राष्ट्रगीत सादर केले. देशभक्तीपर समूहगान कार्यक्रमाचे यंदा पाचवे वर्षे होते झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे संस्थापक नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, स्वामीनारायण शाळेचे स्वामी ज्ञानपुराणी महाराज, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, महापौर रंजना भानसी, माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले, आयर्न गर्ल ऋतुजा सिंगल, नगरसेवक शाहू खैरे, शिवाजी गांगुर्डे, सचिन ढिकले गुलाब भोये, देवेंद्र पटेल, कांतीलाल जयस्वाल आदींसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ‘भारत हमको प्यारा है’ झेंडा गीत, ‘तू नव्या जगाची आशा’ तसेच ‘यापुढे यशाकडे झेप घ्यायची’ असे सामूहिक समूहगान सादर केले यावेळी उद्देशिका वाचन करण्यात आले. पोलीस आयुक्त सिंघल यांनी राष्ट्र अभिमान जागविण्यासाठी देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमांचे सादरीकरण करून राष्ट्रभिमान जागविला पाहिजे, असे सांगितले. ऋतुजा सिंगल यांनी मी जसे घडली तसे तुम्हीदेखील घडावे, उद्या तुम्ही मोठे झाले तर देश घडेल असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक गुरुमित बग्गा यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वामीनारायण शाळेच्या मुख्याध्यापक अस्मिता पटेल यांनी केले. कार्यक्रमाला नाशिक शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिक