यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 08:57 IST2025-11-14T08:54:36+5:302025-11-14T08:57:41+5:30
Kumbh Mela: नाशिक-त्र्यंबकच्या गत कुंभमेळ्यापेक्षा पाचपटीने मोठा कुंभ यावेळी भरणार असल्याने तेवढ्या मोठ्या प्रमाणात सज्जता आणि साधनसुविधा उभारण्याचे आव्हान असल्याचे सांगितले.

यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
नाशिक - नाशिक-त्र्यंबकच्या गत कुंभमेळ्यापेक्षा पाचपटीने मोठा कुंभ यावेळी भरणार असल्याने तेवढ्या मोठ्या प्रमाणात सज्जता आणि साधनसुविधा उभारण्याचे आव्हान असल्याचे सांगितले. मात्र, २०१५ प्रमाणे कोणतीही दुर्घटना न होता निर्मळ गोदावरीसह सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित कुंभ पार पाडायचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी ५,६५८ कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
केल्यानंतर फडणवीस यांनी दर १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला निधीची कोणतीही उणीव भासू दिली जाणार नसल्याचे सांगून गोदावरी स्वच्छ, निर्मळ आणि अविरत प्रवाही राहावी, यासाठीचे नियोजन करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. त्यासाठी सीवेज ट्रीटमेंट प्लांट, चांगले भव्य घाट उभारले जाणार आहेत.
इथे अवघी ५०० एकर
प्रयागराजच्या कुंभमेळ्याला १५ हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून, इथे. मात्र, नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये मिळून गोदाकाठी अवघी ५०० एकर जागा उपलब्धता असल्याने एवढ्याच जागेत पर्वणीच्या गर्दीचेही नियोजन करण्याबरोबरच साधुग्राम उभारण्याची कसरत करावी लागणार असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
बांधकामे पारंपरिक
नाशिकची सर्व बांधकामे ‘कन्झर्व्हेटिव्ह आर्किटेक्चर’द्वारे उभारण्यात येणार असल्याने सर्व बांधकामांचे रूप पारंपरिक राखण्यावर भर दिला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.