मनपाने लावली साडेचार हजार देशी प्रजातीची झाडे

By Admin | Updated: September 29, 2016 00:03 IST2016-09-29T00:02:40+5:302016-09-29T00:03:03+5:30

उपक्रम : शहर परिसर होणार हिरवळीचा

Thirty-five thousand species of native species are planted | मनपाने लावली साडेचार हजार देशी प्रजातीची झाडे

मनपाने लावली साडेचार हजार देशी प्रजातीची झाडे

नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेल्या महापालिकेच्या वृक्ष लागवडीला अखेर मुहूर्त लागला असून, पंचवटी भागात सुमारे साडेचार हजार झाडे लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यंदा देशी प्रजातीची झाडे लावण्यात आली आहेत.
महापालिकेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात येत नाही उलट वृक्षतोड केली जाते, यामुळे पर्यावरणप्रेमी लढा देत आहेत. महापालिकेने वृक्षरोपणातही नवी शक्कल लढवून थेट दहा ते पंधरा फूट उंचीची झाडे लावण्याचा ठेका दिला होता, मात्र हे काम वेळेत सुरू होऊ शकले नाही. आता या कामाला मुहूर्त लागला असून, शहराच्या विविध भागांत वड, पिंपळ, कदंब, भेरलीमाळ, बकूळ, कांचन, जंगली बदाम, तामण, कडुनिंब व भोकर प्रजातीची झाडे लावण्यात आली आहेत. पंचवटी भागातील दिंडोरीरोड, पेठरोड, मखमलाबाद रोड, तारवालानगर लिंक रोड, संगम पूल ते औरंगाबाद रोड, नांदूर नाका ते जत्रा हॉटेल, तसेच मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आल्याचे महापालिकेने कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thirty-five thousand species of native species are planted