शासनाकडून मिळाले तीस कोटी

By Admin | Updated: August 2, 2014 01:21 IST2014-08-02T01:10:18+5:302014-08-02T01:21:35+5:30

शासनाकडून मिळाले तीस कोटी

Thirty crores received by the government | शासनाकडून मिळाले तीस कोटी

शासनाकडून मिळाले तीस कोटी

नाशिक- गेल्या अनेक महिन्यांपासून तगादा लावल्यानंतर राज्यशासनाने अखेरीस ३० कोटी महापालिकेकडे वर्ग केले आहेत. जकात रद्द केल्यानंतर एलबीटी लागु करण्यात आला. त्याचवेळी बिल्डरांना जमिन किंवा घर खरेदी विक्रीसाठी मुद्रांक भरताना एक टक्का अधिभार लावण्यात आला आहे. त्यामाध्यमातून राज्यशासनाकडे ५० कोटी रूपयांच्या आसपास रक्कम जमा झाली आहे. त्यातील ११ कोटी रूपये महापालिकेला प्राप्त झाले होते. परंतु उर्वरीत रक्कम मिळत नव्हती. त्यासाठी पालिकेने तगादा लावला होता अखेरीस ३० कोटी रूपये महापालिकेला प्राप्त झाले आहे. उर्वरीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपआयुक्त हरीभाऊ फडोळ यांनी सांगितले.

Web Title: Thirty crores received by the government