तिसºया श्रावणी सोमवारीही शुकशुकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:14 IST2020-08-10T20:48:51+5:302020-08-11T01:14:16+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यात गर्दीने गजबजून जाणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये तिसºया श्रावणी सोमवारीही ज्योतिर्लिंग मंदिरासह कुशावर्त परिसरात शुकशुकाट होता. फेरी मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्र्यंबकेश्वरला श्रावणातील तिसºया सोमवारला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावणात ब्रह्मगिरीला भाविकांचा फेरीच्या रूपाने वेढा पडलेला असे; पण यंदा कोरोनामुळे गर्र्दी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

तिसºया श्रावणी सोमवारीही शुकशुकाट!
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यात गर्दीने गजबजून जाणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये तिसºया श्रावणी सोमवारीही ज्योतिर्लिंग मंदिरासह कुशावर्त परिसरात शुकशुकाट होता. फेरी मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
त्र्यंबकेश्वरला श्रावणातील तिसºया सोमवारला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावणात ब्रह्मगिरीला भाविकांचा फेरीच्या रूपाने वेढा पडलेला असे; पण यंदा कोरोनामुळे गर्र्दी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
तिसºया सोमवारच्या पालखीला फक्त गावातीलच नागरिकांची किमान पन्नास एक लोकांची गर्दी दिसून आली. त्यात विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, संतोष कदम, पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे, पालिकेचे मुख्य अधिकारी तथा देवस्थानचे पदसिद्ध सचिव संजय जाधव आदींसह प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य आदींसह विश्वस्त उपस्थित होते. पालखी मंदिरातून मेनरोडने कुशावर्तावर वाजतगाजत नेण्यात आली. नेहमीप्रमाणे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. कुशावर्तावरील पूजेचे पौराहित्य चिन्मय फडके, मंगेश दिघे, गिरश जोशी यांनी केले. यावेळी देवाला स्नान करून पूजा, आरती पुष्पांजली वाहण्यात आली व पुन्हा पालखक्ष पारंपरिक मार्गाने म्हणजे लहान बाजारपट्टीतून मंदिरात आणण्यात आली. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कोठी हॉलमध्ये सुवर्णजडीत मुकुटधारी पंचमुखी मुखवटा दाखविण्यात आला. यावेळीही मोजकेच भाविक उपस्थित होेते.त्र्यंबकराजाचे आॅनलाइन दर्शनत्र्यंबकराजाचे दर्शन आॅनलाइन सुरू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे त्र्यंबकराजाचे भाविकांना घरबसल्या दर्शन मिळणार आहे. तसेच मींदर उघडण्याची परवानगी शासनाकडून मिळाल्यानंतर प्रत्यक्ष दर्शन सेवा मिळणारच आहे. तथापि, आॅनलाइन दर्शन सेवा मात्र कायम स्वरूपी मिळणार आहे.
सोमवारी पेगलवाडी फाटा, पहिणे फाटा, वाडिवºहे, घोटी, त्र्यंबकेश्वर मंदिर कुशावर्त तीर्थ आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी फेरी बंद आहे. ब्रह्मगिरी येथे जाऊन गर्दी करू नका, मंदिर बंद असल्याने दर्शन मिळणार नाही, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांसह १ डीवायएसपी, ९ सहायक पोलीस निरीक्षक, ५९ पोलीस कमर्चारी, १० महिला पोलीस कमर्चारी तैनात आहेत. व्यावसायिकांना आर्थिक फटकाकोरोनामुळे मंदिर बंद असल्यामुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बस, प्रवासी वाहतूक, धार्मिक विधी यांच्यावर निर्बंध लावले आहेत. मंदिर उघडल्याशिवाय व एसटी बस, प्रवासी टॅक्सी, वाहतूक सुरु झाल्याशिवाय त्र्यंबकेश्वरची आर्थिक घडी बसणार नाही. तोपर्यंत लोकांना आर्थिक तंगीला तोंड द्यावे लागणार आहे. त्र्यंबकेश्वरचे लॉजिंग हॉटेल्स, फरसाण दुकाने आदी आस्थापना गेल्या चार महिन्यांपासून बंदच आहेत. श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर भेटीसाठी अगर ब्रह्मगिरी फेरीसाठी नाही आले तरी चालते, पण तिस-या श्रावण सोमवारी आले तर संपूर्ण श्रावणाचे व अन्य तीन सोमवारचे पुण्य पदरी पडते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेषकरून तिसºया सोमवारी अलोट गर्दी होत असे.