चोरट्यांनी महिलेचा ‘राणीहार’ लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:59 IST2019-04-25T00:59:25+5:302019-04-25T00:59:47+5:30

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, चोरट्यांकरिता हा हंगाम जणू पर्वणीच ठरत आहे. लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये घरफोडी असो किंवा विवाह सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत मंगल कार्यालये, लॉन्समध्ये चोरी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत.

 The thieves dumped the 'Queen' of the woman | चोरट्यांनी महिलेचा ‘राणीहार’ लांबविला

चोरट्यांनी महिलेचा ‘राणीहार’ लांबविला

नाशिक : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, चोरट्यांकरिता हा हंगाम जणू पर्वणीच ठरत आहे. लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये घरफोडी असो किंवा विवाह सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत मंगल कार्यालये, लॉन्समध्ये चोरी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. तपोवनात अशाच पद्धतीने दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी एका लॉन्सच्या परिसरात रस्ता ओलांडणाºया महिलेच्या गळ्यातील ‘राणीहार’ ओरबाडून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.
तपोवन चौफु लीवरील एका लॉन्समध्ये विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी स्वाती विजय परमेश्वर (३३, रा. पुणे) या वाहनातून उतरल्या व रस्ता ओलांडत असताना पल्सरसारख्या मोटारसायकलवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव आले व त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेला साडेतीन तोळे वजनाचा सुमारे ७० हजार रुपये किमतीचा राणीहार ओरबाडून धूम ठोकली. या हारवर २ हजाराचे एक ग्रॅम सोन्याचे एक गंठणही बनविलेले होते. एकूणच चोरट्यांनी जबरी लूट करत ७२ हजारांचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक सदाफुले करीत आहेत.
गंगापूररोडवरील एका लॉन्समध्ये चक्क वधू कक्षात ठेवलेले सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचे उघडकीस आले होते. तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको परिसरात नागरिकांच्या घरांची कुलपे तोडून हजारो ते लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.
ऐन निवडणुकीची धामधूम अन् लग्नसराईचा हंगाम एकाचवेळी आल्यामुळे पोलीस निवडणूक बंदोबस्तात अडकले असताना चोरट्यांसाठी मात्र लग्नसराई सुगीची ठरत असून ते नागरिकांच्या दागिन्यांवर डल्ला मारताना दिसून येत आहे. कायदासुव्यवस्था टिकविण्यासोबत पोलिसांपुढे शहरात वाढलेल्या जबरी चोºयाही रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Web Title:  The thieves dumped the 'Queen' of the woman