शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गांभीर्य नाही

By admin | Updated: January 10, 2015 00:20 IST

कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गांभीर्य नाही

 त्र्यंबकेश्वर : बारा वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा जागतिक महोत्सव असून, देश-विदेशातून लोक येत असतात. मागच्या कुंभमेळ्यात त्र्यंबकला १५ लाखांपर्यंत भाविक आले होते. यावेळेस प्रशासनाने गर्दीत वाढ होईल, असे सूतोवाच केले आहे. असे सर्व असतानाही शासन त्र्यंबक नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी केला आहे. ते म्हणाले की, त्र्यंबकसाठी वाढीव निधी मंजूर करण्याकरिता अनेकवेळा पाठपुरावा केला. तथापि शासनाकडून अद्याप काहीच हालचाली नाही साधूंनी ७० ते ७५ शेड्स मागितले होते.निविदा निघाल्या फक्त २० शेड्सच्या पालिकेतर्फे ५० शेड्स मंजूर केल्या आहेत, आठ ठिकाणी कामे सुरू आहेत. दोन आखाड्यांकडे जागाच नसल्याने ते दोन आखाडे वगळून याठिकाणी कामे सुरू आहेत. उर्वरित शेड्सचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीवर अवलंबून असल्याचे पालिका अभियंता जुन्नरे यांनी सांगितले. टॉयलेटसाठीही काही आखाड्यात जागा नाही. कामांची परिस्थिती धीम्या गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हवे तेवढे लक्ष दिले जात नाही. अर्थात आपुरा निधी त्यात कामांची काटछाट करून त्र्यंबक पालिकेला अवघे ३५ कोटी (३४.६९ कोटी) दिले. अन्य ठिकाणी ७० ते ७५ कोटी दिले जातात, तर मग कुंभमेळा हा जागतिक महोत्सवाची जबाबदारी शासनाची नाही काय? असा सवालही सागरानंद यांनी उपस्थित केला. शिखर समितीतील फक्त अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बैठक घेतली. शिखर समितीत साधू-महंत व पालिका मुख्याधिकाऱ्यांचा समावेश असताना कोणतेही निमंत्रण नव्हते याबद्दलही नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)