शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

नाशिकमध्ये यापुढे नाल्यांचे बंदिस्तीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 2:09 PM

आयुक्तांची स्पष्टोक्ति : नाले उघडेच राहतील, स्वच्छतेची जबाबदारी पालिकेची

ठळक मुद्दे‘वॉक वीथ कमिशनर’च्या चौथ्या उपक्रमाप्रसंगी महापालिकेकडे ६९ तक्रारी प्राप्त मोकळे भूखंड हे मोकळेच राहतील, तिथे कोणत्याही परिस्थितीत बांधकामे होणार नसल्याचा पुनरुच्चार

नाशिक - शहरातील कोणतेही नाले बुजविले अथवा कॉक्रिंट करून बंदिस्त केले जाणार नाहीत. ते उघडेच राहतील. नागरिकांनी त्यात कचरा टाकणे बंद करावे. नाल्यांची स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची राहिल, अशी स्पष्टोक्ति महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे आयोजित ‘वॉक वीथ कमिशनर’ या उपक्रमात बोलताना केली. उघड्या नाल्यांमुळे होणारी अस्वच्छता आणि डासांचा वाढता उपद्रव यापासून सुटका करण्यासाठी बऱ्याच तक्रारी समोर आल्यानंतर आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले.‘वॉक वीथ कमिशनर’च्या चौथ्या उपक्रमाप्रसंगी महापालिकेकडे ६९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात प्रामुख्याने, अतिक्रमण काढणे, नाले बंदिस्त करणे, मोकळ्या भूखंडावर पावसाळी पाणी साचणे, जॉगिंग ट्रॅकची स्वच्छता करणे, घंटागाडीचा अनियमितता, सीटी गार्डनमधील खेळण्यांची दुरवस्था, मोकाट जनावरांचा उपद्रव आदी विविध समस्यांचा समावेश होता. यावेळी, नाल्यांच्या साफसफाईबद्दल आणि ते बंदिस्त करण्यासंदर्भात काही तक्रारी समोर आल्या. सदाशिवनगर तसेच जॉगिंग ट्रॅकजवळील नाला बंदिस्त करण्याची मागणी आली असता, त्यावर आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीत नाले बंदिस्त केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर सामाजिक सभागृहासह महिलांसाठी सभागृह उभारण्यासंबंधीच्या सूचना आल्या असता, आयुक्तांनी मोकळे भूखंड हे मोकळेच राहतील, तिथे कोणत्याही परिस्थितीत बांधकामे होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. ज्याठिकाणी पब्लिक अ‍ॅमेनिटीजसाठी आरक्षण आहे, तेथे बांधकामे करता येऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुरुगोविंदसिंग कॉलेजसमोरील जागेत महिलांसाठी सभागृह बांधण्यास मंजुरी असल्याची बाब सूचना करणा-या महिलेने निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असता, आयुक्तांनी मोकळ्या भूखंडांबाबतची माझी पॉलीशी असल्याचे सांगत तेथे महिला सभागृह होणार नसल्याचे ठणकावून सांगितले. शहरात १८ ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असून त्याठिकाणी रोज साफसफाई होण्यासाठी माणसे नियुक्त केल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. महापालिकेच्या कर्मचा-याने नाला बुजवून अतिक्रमण केल्याची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याचे समोर आल्यानंतर आयुक्तांनी सदर कर्मचाºयास तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. सिटी गार्डन रात्री ९ नंतर बंद करण्याची आणि गार्डनसाठी शुल्क आकारणीची मागणी एका नागरिकाने केली असता, आयुक्तांनी तेथेच जनमत घेतले आणि अनुकूल प्रतिसादानंतर शुल्क आकारणीची कार्यवाही करण्याची सूचना केली. गतिरोधकासंबंधीचेही बरेच प्रश्न आयुक्तांनी धुडकावून लावले. रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीच्या मान्यतेनेच यापुढे गतिरोधक टाकले जातील, असेही त्यांनी वारंवार स्पष्ट केले

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे