शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर सिंहस्थावर बहिष्कार

By admin | Updated: July 29, 2014 00:51 IST

...तर सिंहस्थावर बहिष्कार

 

सिंहस्थात आखाड्यांसाठी राखीव ठेवलेली संपूर्ण जागा यंदाही द्यावी. त्या जागेवर झालेले अतिक्रमण पूर्णत: काढावे, तसे न झाल्यास सिंहस्थावरच बहिष्कार टाकू, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी दिला. सिंहस्थाच्या कामांची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये आले असता मुंबई नाका येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, इतर ठिकाणी ज्याप्रमाणे होतो तेवढ्याच भव्य प्रमाणात येथेही सिंहस्थ होतो. महाराष्ट्र आणि नाशिक जगभरात प्रसिद्ध आहे. येथील सिंहस्थही भव्यदिव्य असाच व्हावा, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे पाहणी करून येथील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी, तसेच बैठकीत सहभागी होण्यासाठी मी येथे आलो आहे. सिंहस्थ जवळ आला असून, अद्यापही कामांची सुरुवात नसल्याने त्याबाबतही आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. उद्या संपूर्ण दिवसभर नियोजनाची पाहणी करून ३० रोजी होणाऱ्या बैठकीत प्रशासनाला योग्य त्या सूचना करू, असेही ते म्हणाले. अरुंद शाही मार्ग आणि नवा शाही मार्ग याबाबत विचारले असता चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये, अशीच आमचीही इच्छा आहे. यासाठी मार्ग रुंद हवेत आणि नव्या शाही मार्गाबाबत आपण अधिकाऱ्यांशी, तसेच आखाड्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेऊ, असेही महंत ग्यानदास म्हणाले. पवित्र गोदावरीचे पावित्र्य जपले जायला हवे. साधू- संतांना देण्यात येणाऱ्या सुविधा चांगल्या असाव्यात. आता आमच्या आखाड्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी १५० महंत होते, आता ते ७०० झाल्यामुळे त्यांना पुरेशी जागाही उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. यासाठी आम्हाला पूर्वी दाखविलेल्या जागेचा नकाशा आणि आश्वासन दिले तेवढी जागा उपलब्ध करून द्यायला हवी. त्या जागेवर जर अतिक्रमण झाले असेल, तर ते पाडण्यात यावे, अन्यथा आम्ही सिंहस्थ होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी आमदार वसंत गिते, महापौर यतिन वाघ, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, महंत भक्तिचरणदास, महामंडलेश्वर देवबाप्पाजी महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)