एकाच दिवशी तीन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:21 IST2021-12-08T01:21:08+5:302021-12-08T01:21:33+5:30

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी पुन्हा एकाच दिवसात तीन दुचाकी परिसरातून गायब केल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft of three bikes in one day | एकाच दिवशी तीन दुचाकींची चोरी

एकाच दिवशी तीन दुचाकींची चोरी

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी पुन्हा एकाच दिवसात तीन दुचाकी परिसरातून गायब केल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन रामचंद्र गांगुर्डे (४९) यांनी आपल्या घरासमोर पार्क केलेली (एम.एच १५ डी.व्ही ४४४६) होंडा शाइन कंपनीची दुचाकी घरासमोर पार्क केली असताना चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलाखाली घडली. सुनील सदाशिव वाघचौरे (रा. वंदन अपार्टमेंट, अंबड) यांच्या मालकीची (एम.एच. १५ एफ. एक्स. ४६५३) काळ्या रंगाची हिरोहोंडा कंपनीची पॅशन गाडी उड्डाण पुलाखाली लावलेली असताना चोरट्यांनी चोरून नेली.

तिसरी घटना एमआयडीसी परिसरात घडली, बबन छबू तालखे (रा. विल्होळी) यांच्या मालकीची दुचाकी (एम. एच. १५ सी. एच. ६३३५) चोरट्यांनी गायब केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Theft of three bikes in one day