गंगापूररोड परिसरातून चंदनवृक्षाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 18:29 IST2018-09-02T18:28:44+5:302018-09-02T18:29:35+5:30

नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील चंदनाची पाच, आर्मी हद्दीतील चंदनाचा एक वृक्ष तोडून सुवासिक खोड चोरल्याच्या घटनेस काही दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी गंगापूर रोड परिसरातील चंदनाचे झाड तोडून त्याचे सुवासिक खोड चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१) घडली़

 Theft of sandalwood from Gangapur Road area | गंगापूररोड परिसरातून चंदनवृक्षाची चोरी

गंगापूररोड परिसरातून चंदनवृक्षाची चोरी

ठळक मुद्दे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील चंदनाची पाच, आर्मी हद्दीतील चंदनाचा एक वृक्ष तोडून सुवासिक खोड चोरल्याच्या घटनेस काही दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी गंगापूर रोड परिसरातील चंदनाचे झाड तोडून त्याचे सुवासिक खोड चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१) घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूररोडवरील लोकमान्य नगरमध्ये उज्वला चंद्रकांत कापसे यांचा बंगला आहे़ त्यांच्या बंगल्याच्या आवारात चंदनाचे झाड असून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास २५ हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड तोडून नेले़

याप्रकरणी कापसे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Theft of sandalwood from Gangapur Road area