तीन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:35 IST2019-08-17T00:34:45+5:302019-08-17T00:35:12+5:30
शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, इंदिरानगर भागातील एक व नाशिकरोडला झालेल्या दोन अशा एकूण तीन घरफोड्यांमध्ये सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

तीन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज चोरी
नाशिक : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, इंदिरानगर भागातील एक व नाशिकरोडला झालेल्या दोन अशा एकूण तीन घरफोड्यांमध्ये सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पाथर्डी फाटा परिसरातील हनुमाननगरच्या विराज अपार्टमेंटमधील सचिंद्र पन्नालाल सुराणा (४८) यांचे पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर येथील श्री वर्धमान इलेस्ट्रोनिकल्स अँड हार्डवेअर नावाचे दुकान असून, अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करीत १६ हजार रुपयांची रोकड लांबविली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक जगताप याप्रकरणाचा तपास कपीत आहेत, तर दुसरी घटना नाशिकरोडच्या गोरेवाडी शास्त्रीनगर भागात घडली. येथील बुद्धविहाराशेजारील अमर सोसायटीतील भक्ती दीपक शिरसाठ यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत कपाटातील दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि १८ हजार ३०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मुकणे अधिक तपास करीत आहेत.
दागिने लंपास
अमृत सोसायटीत घरफोडीची घटना घडली असून, येथील रंजना बाळू पवार (४०) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्याचा नेकलेस, कानातील कुडके, कानातील टॉप्स, जोड, मुरण्या, अंगठी, चैन, मंगळसूत्र, चांदीच्या पट्ट्या असा तीन लाख लाख ३३ हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला.