सुरगाणा पोस्ट कार्यालयात २ लाख ३५ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:19 IST2021-04-05T19:34:46+5:302021-04-06T00:19:48+5:30

सुरगाणा : येथील पोस्ट कार्यालयात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून पैशांची लोखंडी तिजोरीच उखडून नेत रोख रकमेसह विविध प्रकारचे तिकिटे, रेव्हेन्यू तिकिटे आदींसह २ लाख ३५ हजार ७०८ रुपयांची चोरी झाली.

Theft of 2 lakh 35 thousand at Surgana post office | सुरगाणा पोस्ट कार्यालयात २ लाख ३५ हजारांची चोरी

सुरगाणा पोस्ट कार्यालयात २ लाख ३५ हजारांची चोरी

ठळक मुद्देतीन चार वर्षांपूर्वी याच पोस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला होता,

सुरगाणा : येथील पोस्ट कार्यालयात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून पैशांची लोखंडी तिजोरीच उखडून नेत रोख रकमेसह विविध प्रकारचे तिकिटे, रेव्हेन्यू तिकिटे आदींसह २ लाख ३५ हजार ७०८ रुपयांची चोरी झाली.

गेल्यावर्षी मार्चमध्ये ह्याच पोस्टात हीच तिजोरी लंपास केली होती. येथील पोस्ट अधिकारी मनोहर पालवा यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यात रोख रक्कम १ लाख ८० हजार ८०७ रुपयांसह विविध प्रकारची तिकिटे, रेव्हेन्यू तिकिटे, एरोग्रॅम, आयपीओ, पोस्ट कार्ड, १ डीव्हीआर कॅमेरा, बीएसएनएल मॉ॑डम, १ हार्डडिक्स असा एकूण दोन लाख पस्तीस हजार सातशे आठ रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे म्हटले आहे.

बांधकामात असलेली लोखंडी तिजोरी खोलता न आल्याने अज्ञात चोरट्यांनी बांधकाम तोडून तिजोरीच सोबत घेऊन गेले आहेत. तीन चार वर्षांपूर्वी याच पोस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला होता, तर गेल्यावर्षी मार्चमध्ये याच पद्धतीने तिजोरी पळवली होती. सुदैवाने तिजोरी फोडता न आल्याने मोठी रक्कम सहीसलामत शहरापासून काही अंतरावर मिळून आली होती.

तिसऱ्या वेळी झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोस्टातील पैशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पोस्टातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली होती.


सुरगाणा पोस्ट कार्यालयातील लोखंडी तिजोरी काढून नेण्यासाठी अज्ञात चोरट्यांनी तोडलेले बांधकाम. (०५ सुरगाणा)

Web Title: Theft of 2 lakh 35 thousand at Surgana post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.