पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 01:21 IST2022-03-12T01:21:32+5:302022-03-12T01:21:54+5:30

सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात समृद्धी महामार्गाच्या कामावरील एकाचा जेसीबी पोकलेनखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

The driver died after being crushed under the Pokलेmon | पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू

पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू

सिन्नर: तालुक्यातील शिवडे शिवारात समृद्धी महामार्गाच्या कामावरील एकाचा जेसीबी पोकलेनखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गाच्या शिवडे येथील कॅम्पवर गौरबच्चिनसंग इंदरिसंग (५१, रा. पंजाब, हल्ली मु. शिवडे) हा जेसीबी पोकलेन ऑपरेटर म्हणून काम करतो. इंदरिसंग त्याच्या ताब्यातील पोकलेन हा शिवडे शिवारातील पंडित संतु वाघ यांच्या शेत गट क्र. ४८४ मधील समृद्धी कॅम्पच्या खडी क्रशरची साफसफाई करत होता. पोकलेनमध्ये काही बिघाड झाल्याने त्याने पोकलेन मशीन चालू स्थितीत ठेवून पोकलेनच्या लिव्हरवर दगड ठेवत खोल फिटिंग करू लागला. मात्र, दगड निसटल्याने पोकलेन पुढे चालू लागल्याने इंदरिसंगचे डोके व छाती पोकलेनखाली दबली गेली. येथील कामगारांनी तत्काळ पोकलेन घेतला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The driver died after being crushed under the Pokलेmon