मुळाणे घाट अपघातातील मृतांची संख्या सात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 01:11 IST2022-06-04T01:11:09+5:302022-06-04T01:11:31+5:30

मुळाणे घाटामध्ये झालेल्या अपघातातील एका जखमीचे जिल्हा रुग्णालयात निधन झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, वणी पोलीस स्टेशनला ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

The death toll in Mulane Ghat accident is seven | मुळाणे घाट अपघातातील मृतांची संख्या सात

मुळाणे घाट अपघातातील मृतांची संख्या सात

दिंडोरी : मुळाणे घाटामध्ये झालेल्या अपघातातील एका जखमीचे जिल्हा रुग्णालयात निधन झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, वणी पोलीस स्टेशनला ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी मुळाणे घाटामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली कारवर उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी असलेल्या गणेश बापू पवार (७) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या सात झाली आहे. वणी पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The death toll in Mulane Ghat accident is seven