पेठ - नाशिक ते पेठ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ शहरानजीक असलेल्या आरटीओ चेकनाक्यावर उभ्या असलेल्या अवजड ट्रेलरखाली कार घुसल्याने कारचालक जखमी झाला आहे. याबाबत पेठ पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रविवारी ( दि. १ ) सायंकाळी महामार्गावरील आरटीओ चेकनाक्यावर ट्रेलर (एमएच ४६ बीबी ७१७१) उभा असताना पेठहून नाशिककडे जाणाऱ्या कारने (एमएच १५ एचजी २९९२) ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने दोन्ही वाहनांच्या नुकसानीसह कारचालक जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत पेठ पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पेठला चेकनाक्यावर ट्रेलरखाली घुसली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 01:43 IST