बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:15 IST2025-07-15T16:14:17+5:302025-07-15T16:15:06+5:30

Nashik Crime news: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. एका जोडप्याने बेडरूममध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

The bedroom door rang, the mother became suspicious; as soon as the door was broken down, the husband and wife were seen in a pool of blood | बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

Nashik Latest News: मुलगा आणि त्याची बायको दुपारच्या वेळी बेडरुममध्ये गेले होते. बऱ्याच वेळाने आई उठली आणि तिने बेडरुमचा दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आईला संशय आला. तिने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर बेडरुममध्ये येताच पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून सगळेच हादरले. नाशिकमधील सिडको भागात ही घटना घडली.    

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नाशिकमधील सिडको परिसरातील अंबड गावाजवळ असलेल्या फडोळ मळा भागात एका दाम्पत्याने विष प्राशन करत हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. 

वाचा >>पुण्यात दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?

नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांना अत्यवस्थ स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. सचिन गवळी (४०) आणि माया गवळी (३८) अशी दोघांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

अंबड फडोळ मळा भागात राहणाऱ्या गवळी दाम्पत्याने सोमवारी (दि.१४) दुपारी घरातील बेडरूमचा दरवाजा बंद करून विष प्राशन केले यानंतर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरात सचिन यांच्या आई होत्या, तर वृद्ध वडील लहान मुलांना शाळेत घेण्यासाठी गेले  होते.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते नवरा बायको

आईने बेडरूमचा दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय आला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून बघितले असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले आढळून आले. स्थानिक नागरिकांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

या दोघांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. गवळी दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: The bedroom door rang, the mother became suspicious; as soon as the door was broken down, the husband and wife were seen in a pool of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.