शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या मृत्यूनंतर तणाव

By admin | Updated: September 30, 2016 23:20 IST

टाके घोटी : शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप

घोटी : इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी शिवारात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बुधवारी संध्याकाळी शाळेचा फलक लावण्यासाठी सुमारे साठ फूट उंचावर गेलेल्या युवकाचा सिमेंटचा पत्रा फुटल्याने उंचावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळा प्रशासनाने मृत युवकाच्या नातलगांना न कळवता जबाबदारी झटकल्याने संतप्त झालेल्या नातलगांनी आणि घोटी ग्रामस्थांनी आज सकाळी या युवकाचा मृतदेह शाळेच्या आवारात आणून ठेवला. जोपर्यंत शाळा प्रशासन जबाबदारी स्वीकारत नाही व योग्य तोडगा काढीत नाही तोपर्यंत शाळेच्या आवारातून मृतदेह हालविणार नाही व अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका शाळेच्या आवारात जमलेल्या शेकडो जणांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.घोटी येथील रवींद्र वासुदेव रसाळ (३०) याचा पेंटर व बॅनर तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्याला टाके घोटी येथील पंचवटी इंग्लिश स्कूलमध्ये फलक तयार करण्याचे काम मिळाले होते. बुधवारी संध्याकाळी रवींद्र तयार झालेला फलक घेऊन शाळेत गेला असता त्याला शाळेच्या मुख्याध्यापकाने फलक शाळेच्या इमारतीवर लावण्याची बळजबरी केली. इच्छा नसतानाही रवींद्र साठ फूट उंचीच्या छतावर चढला; मात्र सिमेंटचा पत्रा अचानक तुटल्याने या पत्र्यासह रवींद्र साठ फूट जमिनीवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या बाबीकडे दुर्लक्ष करीत जबाबदारी झटकत नातलगांना न कळविता मृतदेह परस्पर रुग्णालयात हलविला. दरम्यान, सदरचा प्रकार आज सकाळी नातलगांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत जाब विचारण्यासाठी शाळेत धाव घेतली. (वार्ताहर)शाळा व्यवस्थापनाचे कोणीही उपस्थित नसल्याने त्या युवकाचा मृतदेह शाळेच्या आवारात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सकाळी ११ वाजता सदर युवकाचा मृतदेह शाळेच्या आवारात आणून ठेवण्यात आला. जोपर्यंत या युवकाच्या मृत्यूची जबाबदारी शाळा प्रशासन घेत नाही. या युवकाच्या मृत्यूस शाळा प्रशासन जबाबदार असल्याने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.४शाळा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या सूचनेवरून नीलकंठ सोनवणे, रामदास गांगुर्डे आदिंचे पथक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मध्यस्थी करीत मृत युवकाच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्याचे शाळा व्यवस्थापनाने जाहीर केल्यानंतर हा मृतदेह तब्बल दोन तासांनंतर अंतिम विधीसाठी हलविण्यात आला.