शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

सांगा, आम्ही काय करायचे अन‌् कुठे जायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:50 AM

‘रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही,  ऑक्सिजन बेड शिल्लक नाही, सांगा, आम्ही काय करायचे आणि कुठे जायचे’, असा आर्त सवाल  कळवण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक करताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या नातेवाइकांचा सवाल इंजेक्शन, ऑक्सिजन बेडचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

कळवण : ‘रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही,  ऑक्सिजन बेड शिल्लक नाही, सांगा, आम्ही काय करायचे आणि कुठे जायचे’, असा आर्त सवाल  कळवण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक करताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कोविड सेंटरला ऑक्सिजन, वैद्यकीय यंत्रणेसह मनुष्यबळ पुरविण्यात अपयशी ठरली.  त्यामुळे यंत्रणा व आरोग्य सेवा द्या, नाहीतर कोविड सेंटरला कुलूप लावण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला होता. तरीही तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अद्याप ढिम्म असल्यामुळे ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव गुदमरत आहे. कळवण तालुक्यातील रुग्णसंख्या ७५० पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यासाठी वैद्यकीय उपचार यंत्रणा कमी पडत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे. परंतु कळवण तालुक्यातील अभोणा व मानूर या  शासकीय कोविड सेंटर  आणि कळवण शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या प्रकृतीत बिघाड होत आहे. ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने सिलिंडरच्या शोधात रोज देवळा, सटाणा, मालेगाव, पिंपळगाव, नाशिक, सिन्नर, विल्होळी येथे त्यांची भटकंती चालू आहे. कळवण तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कळवण, अभोणा आणि सुरगाणा येथे हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्यातील नायट्रोजन व कार्बनडायऑक्साइड बाजूला करून जम्बो सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा  प्रयत्न चालू आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध होईल. - नितीन पवार, आमदार रुग्ण प्रतीक्षा यादीत कोरोनाकाळात डॉक्टर चांगल्या पद्धतीने काम करत असले तरी त्यांच्या पुढे अनेक समस्या येत असून, रुग्णांना ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. सध्या अभोणा, मानूर येथील कोविड सेंटरमध्ये  बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत; परंतु उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो; मात्र खासगी रुग्णालयातदेखील ऑक्सिजनअभावी रुग्ण दाखल करून घेतले जात नाही.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicinesऔषधं