शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक समितीने फिरविली पाठ

By admin | Updated: November 18, 2016 00:04 IST

तलाठी दिवसभर ताटकळले : आंदोलन कायम, सर्व्हरचा त्रास होत असल्याची तक्रार

 नाशिक : तलाठी सजांची पुनर्रचना, मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा विस्तार व संगणकीय कामकाज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे पंधरा हजार तलाठी, मंडळ अधिकारी बुधवारपासून संपावर गेलेले असताना त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी येणाऱ्या शासनाच्या समितीनेही नाशिककडे पाठ फिरविल्याने जो संगणकीय अडचणींचा सामना तलाठ्यांना करावा लागतो, तसाच समितीच्या लहरी कारभाराचा अनुभव त्यांना घ्यावा लागला आहे. सोमवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत बैठक घेऊन तलाठ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने संगणकीय कामकाज करताना म्हणजेच सातबारा उताऱ्याची नोंद, फेरफार नोंदी आदि बाबी संगणकात नोंद करताना सर्व्हरचा त्रास होत असल्याची मुख्य तक्रार तलाठी संघटनेने केली होती. इंटरनेटची जोडणी नसणे, असलीच तर त्याला स्पीड नसणे यासारख्या गोष्टींमुळे कामकाजाची गती कमी होत असल्याने सर्व्हरचे प्रमाण वाढवून मिळावे, अशी त्यांची मुख्य मागणी होती. महसूलमंत्र्यांनी त्यावर अभ्यास करण्यासाठी व वास्तव तपासून पाहण्यासाठी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञ तसेच राज्याच्या जमाबंदी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. या समितीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तलाठ्यांना कामकाजात येणाऱ्या अडचणी व तांत्रिक दोषाबाबत माहिती गोळा करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातूनच या संदर्भात अधिक तक्रारी येत असल्याने या समितीने आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नाशिकपासूनच करण्याचे ठरविले होते व त्यासाठी गुरुवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही समिती भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी व तलाठ्यांशी चर्चा करणार होती. या चर्चेसाठी सकाळी नऊ वाजेपासूनच तलाठी व मंडळ अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तथापि, सायंकाळपर्यंत या समितीचे नाशकात आगमनच न झाल्याने अखेर वैतागलेल्या तलाठ्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, बुधवारपासून सुरू झालेले तलाठ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने त्याचा परिणाम दिसू लागला आहे. (प्रतिनिधी)