शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:33 PM

केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त वतीने होत असलेल्या निष्ठा प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा मुंगसे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षकांच्या गुणवत्ता-वाढीसाठी तसेच अध्ययन अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होण्यासाठी निष्ठा प्रशिक्षण घेण्यात आले.

दाभाडी : केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त वतीने होत असलेल्या निष्ठा प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा मुंगसे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षकांच्या गुणवत्ता-वाढीसाठी तसेच अध्ययन अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होण्यासाठी निष्ठा प्रशिक्षण घेण्यात आले.मालेगाव गटातून प्रतिटप्प्यात १५० शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या पाचव्या टप्प्यात दाभाडी, सौंदाणे, सोनज, जळगाव, नि. पाटणे या केंद्रातील शिक्षकांनी १३ ते १८ जानेवारीपर्यंत प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणासाठी शिक्षण विस्ताराधिकारी आत्माराम अहिरे यांनी मालेगाव गटाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. विद्या प्राधिकरण नाशिकच्या डॉ. भारती बेलन या निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. राज्यस्तरावर प्रशिक्षण घेतलेले प्रवीण शिंदे (इंग्रजी), चेतन निकम (गणित), नीलेश भामरे (भाषा) व विशाल मिसर (विज्ञान) या तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख साहेबराव बच्छाव, शिवाजी गुंजाळ, शोभा हिरे, सुनंदा पवार यांच्यासह दाभाडी, पाटणे, सौंदाणे, सोनज, जळगाव नि. केंद्रातील जिल्हा परिषद व शासकीय आश्रमशाळेतील दीडशे शिक्षकांनी आनंददायी वातावरणात प्रशिक्षण घेतले. समग्र शिक्षा अभियानचे महेंद्र पवार, रहीम कुरेशी, संतोष भांड यांनी नियोजन केले. प्रशिक्षणाच्या निष्पत्तीतून मिळालेल्या माहितीद्वारे रत्ना काकळीज व चंद्रभान पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले, तर सचिन शिंदे यांनी आभार मानले.

टॅग्स :Teacherशिक्षक