इगतपुरीत शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 15:26 IST2020-02-01T15:26:32+5:302020-02-01T15:26:44+5:30
इगतपुरी : अशैक्षणिक कामातुन वगळण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

इगतपुरीत शिक्षकांचे धरणे आंदोलन
इगतपुरी : अशैक्षणिक कामातुन वगळण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका नेते जनार्दन कडवे व तालुकाध्यक्ष सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती आणि कर्तव्यच मुळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांची बांधिलकी आहे. बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा २०९९ मधील कलम २७ चा विचार करता शिक्षकांच्या सेवा कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी असु नये हे अभिप्रेत असतांना सुध्दा प्रशासकीय यंत्रणा कायद्यातील अपवादात्मक तरतुदींचा विपर्यास करत शिक्षकांना अशैक्षणकि कामे करण्यास भाग पाडतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना निवडणूक यंत्रणेने बीएलओ म्हणुन नियुक्ती केल्यापासुन वर्षभर अनेक शिक्षक या कामात गुंतुन असुन मतदार यादी पुर्नरिक्षण व निवडणूक विषयक कामाच्या सतत चालणाऱ्या प्रक्रियेमुळे शाळेतील अध्यापन कार्य प्रभावित होत आहे. या सोबतच अन्य अशैक्षणिक कामे सुद्धा अनेक प्रसंगी दिले जातात. न्यायालयाने शिक्षकांना बीएलओ म्हणुन काम करण्याची सक्ती करता येणार नाही तसेच काम करण्यास नाकारणाºया शिक्षकांवर कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश देऊनही यंत्रणा बळजबरीने आणि लोकप्रतिनिधी कायद्याचा अनाकलनीय धाक दाखवत आहे. म्हणुन शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
या प्रसंगी सुनील भामरे, प्रकाश सोनवणे, निवृत्ती नाठे, वैभव गगे, प्रशांत वाघ, सुनील सांगळे, विनता धोती, मोनाली देशमुख, मंजुषा अिहरे, गणेश भामरे, जगन्नाथ बिरारी, योगेश भामरे, पराग कोकणे, सौरभ अिहरराव, शिवाजी थेटे, दिशा सोनवणे, नंदा शिरसाठ, सुहास रकिबे, अल्का भारंबे, मनिषा चौधरी, चेतना गावित, माणिक भालेराव आदी शिक्षक समतिीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.