टाकेद साई पदयात्रा दिंडीचे शिर्डीकडे प्रयाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:17 IST2021-01-23T18:16:07+5:302021-01-23T18:17:07+5:30
सर्वतिर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वतिर्थ टाकेद येथून साईभक्तांच्या पदयात्रा दिंडीचे शिर्डीकडे शनिवारी (दि.२३) सकाळी प्रयाण झाले.

टाकेद साई पदयात्रा दिंडीचे शिर्डीकडे प्रयाण
सर्वतिर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वतिर्थ टाकेद येथून साईभक्तांच्या पदयात्रा दिंडीचे शिर्डीकडे शनिवारी (दि.२३) सकाळी प्रयाण झाले.
२००१ साली अकरा साईभक्तांनी सुरु केलेल्या पदयात्रा दिंडीचे आज एकविसाव्या वर्षात पदार्पण झाले. सकाळी नऊ वाजता डिजेच्या तालावर साईंच्या पालखीची पुर्णगावाला प्रदक्षणा घालण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, साईंच्या सुमधूर गीतांवर नाचत व वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली.
प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. परिसरातील सर्व महिला पुरुष व लहान-मोठ्यांनी पालखीचे औक्षण करुन साईंचे दर्शन घेतले यावेळी सुरक्षीत अंतराचे पालन करण्यात येत होते.
या वेळी डॉ. साईनाथ रेड्डी, महावीर शहा, दिपक परदेशी, दतात्रय केवारे, सरला कोरडे, विष्णू ब-हे, संतोष साबळे, दतात्रय चव्हाणके, चंद्रकांत आढार, गणेश परदेशी, रामचंद्र परदेशी, डॉ. श्रीराम लहामटे, सरपंच ताराबाई बांबळे, रेखा परदेशी, माजी सरपंच वेणूताई बळे, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, रतन बांबळे, राम शिंदे, विकास जोशी, विठ्ठल भले, संजय धादवड, शहाबाज शेख आदी उपस्थित होते.