शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूसदृश तिघांचा मृत्यू

By admin | Updated: April 20, 2015 00:31 IST

तीन दिवसांतील घटना : आरोग्य यंत्रणेने सतर्क होण्याची गरज

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात स्वाइन फ्लूसदृश आजाराने तीन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. मूळ शहा येथील व कल्याण येथे नोकरीला असलेले नवनाथ रामनाथ जाधव (४५) यांना तीन दिवसांपूर्वी नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली होती. पाथरे येथील जगन्नाथ सुकदेव डुंबरे (५५) यांना चार दिवसांपूर्वी पोहेगाव व त्यानंतर कोपरगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. डुंबरे यांच्यातही स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आली होती. शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. पाथरे येथे शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर ैअंत्यसंस्कार करण्यात आले. खबरदारीसाठी डुंबरे यांच्या कुटुंबीयांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे देण्यात आली आहेत. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी फर्दापूर येथील रानडे नामक महिलेचाही स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. रानडे यांनाही स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आल्याने नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिघांचाही स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला असला, तरी याबाबतचा अहवाल शासकीय आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. त्र्यंबके यांनी दिली. खासगी रुग्णालयातून त्यांच्या स्वाइन फ्लू सदृश आजाराला पुष्टी जोडली जात असली तरी त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. (वार्ताहर)