शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लू रुग्णांना मिळणार भरपाई

By admin | Updated: March 29, 2015 00:45 IST

शासनाची समिती स्थापन : लवकरच होणार कार्यवाही

नाशिक : स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्यानंतर आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक रुग्णांच्या उपचारासाठी झालेला खर्च परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आणि अनेक ठिकाणी रुग्णांचे मृत्यू झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यातही स्वाइन फ्लूची लागण मोठ्या प्रमाणात झाली. त्याची दखल घेऊन राज्यशासनाने वैद्यकीय उपाययोजना राबविल्या शिवाय स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली. शासकीय रुग्णालयात तर जवळपास मोफत उपचार होतच असतात; परंतु खासगी रुग्णालयातदेखील मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने शासनाने खासगी रुग्णालयांतदेखील मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली. आता या घोषणेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, रुग्णांचा अशाप्रकारे झालेला खर्च परत देण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जिल्हा शल्यचिकित्सक आणि अन्य मान्यवरांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिली. दरम्यान, नाशिक शहरात आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली. सध्या महापालिकेच्या रुग्णालयात केवळ दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १ जानेवारीपासून २७ मार्चपर्यंत दोन हजार ४९७ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी १ हजार ११३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर आत्तापर्यंत ९३ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे आढळले आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)