सफाई कर्मचारी बनल्या गावच्या कारभारीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 09:52 PM2021-11-24T21:52:56+5:302021-11-24T21:53:19+5:30

जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सत्यभामा शिंदे यांची निवड करण्यात आली. सरपंच विकास गायकवाड यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सत्यभामा शिंदे यांना प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार देण्यात आला. सत्यभामा यांनी याच ग्रामपंचायतीत २५ वर्षे सफाई कामगार म्हणून काम पाहिले. त्याच सत्यभामाबाई आता सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या आहेत.

Sweepers became village stewards | सफाई कर्मचारी बनल्या गावच्या कारभारीण

सफाई कर्मचारी बनल्या गावच्या कारभारीण

Next
ठळक मुद्देजळगाव नेऊर : सत्यभामा शिंदे प्रभारी सरपंच

जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सत्यभामा शिंदे यांची निवड करण्यात आली. सरपंच विकास गायकवाड यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सत्यभामा शिंदे यांना प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार देण्यात आला. सत्यभामा यांनी याच ग्रामपंचायतीत २५ वर्षे सफाई कामगार म्हणून काम पाहिले. त्याच सत्यभामाबाई आता सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या आहेत.
ग्रामपंचायत सदस्य रंजना शिंदे, आत्माराम शिंदे, मच्छिंद्र शिंदे, विमल घुले, राधाकिसन वाघ, सुनीता शिंदे, अनिता कुराडे उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक बाळनाथ बोराडे यांनी काम पाहिले. यावेळी बबन शिंदे, उत्तम दाते, संजय शिंदे, प्रभाकर घुले, प्रवीण शिंदे, राजेंद्र शिंदे, पांडुरंग मस्के, भाऊसाहेब शिंदे, गोरख वाघ, बाळासाहेब शिंदे, वाल्मीक हुजरे आदी उपस्थित होते.

सफाई कर्मचारी ते प्रभारी सरपंच
जळगाव नेऊर ग्रामपंचायतीत सत्यभामा नाना शिंदे या सफाई कर्मचारी महिलेला प्रभारी सरपंचपदाचा मान मिळाला. २५ वर्षे त्या येथील ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या. पण त्यांचा मुलगा आणि सून नोकरीला असल्याने स्वेच्छानिवृत्ती घेत ज्या ग्रामपंचायतीमध्ये पंचवीस वर्षे सफाई कर्मचारी म्हणून काम केले त्याच ग्रामपंचायतीमध्ये प्रभारी सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान सत्यभामा यांना मिळाल्याने त्यांचे गावात कौतुक होत आहे.
 
Web Title: Sweepers became village stewards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.