शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यम : म्हणे, बिबट्याने केल्या वीसपेक्षा अधिक कोंबड्या फस्त

By admin | Updated: April 24, 2017 14:38 IST

एक वर्षापेक्षा अधिक वयाचा बिबट्या एका वेळेस केवळ दोन ते अडीच किलो खाद्य खाऊ शकतो.

अझहर शेख / नाशिक : एक वर्षापेक्षा अधिक वयाचा बिबट्या एका वेळेस केवळ दोन ते अडीच किलो खाद्य खाऊ शकतो. यापेक्षा अधिक खाद्य नैसर्गिकदृष्टया तो खात नसल्याचा निष्कर्ष वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अभ्यासानंतर काढला आहे; मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात घडलेल्या एका घटनेत बिबट्याने चक्क वीसपेक्षा अधिक कोंबड्या फस्त केल्याची चर्चा रंगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वस्तुस्थिती वेगळीच असून कोंबड्यांच्या खुराड्यामधील दोन ते तीन कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या तर एक लहान बोकडाच्या मानेला दुखापत झाल्याचे निरिक्षणात आढळल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.बिबट्या हा मार्जार कुळामधील ‘अभिमन्यू’ म्हणून ओळखला जातो. त्याची शिकार करण्याची आणि ते शिकार वापरण्याची पध्दत अन्य वन्यप्राण्यांपेक्षा जरा हटके आहे. बिबट्याने एकावेळी केलेली शिकार तो अनेकदा खातो. जोपर्यंत त्याची शिकारीचे खाद्य संपुष्टात येत नाही, तोपर्यंत शक्यतो बिबट्या अधिवास सोडून शिकारीसाठी भटकंती करत नसल्याचे वनविभागाच्या सुत्रांचे म्हणणे आहे. एकदा शिकार केल्यानंतर बिबट्या ती शिकार पुरवून-पुरवून खातो. जंगलामध्ये वावरणारा बिबट्या हा पुर्ण वाढ झालेला असल्यास तो पाच किलोपेक्षा अधिक खाद्य एकावेळी खाऊ शकतो; मात्र जंगलाबाहेर डोंगर,किंवा उसशेतीच्या परिसरात वावरणारा बिबट्या एकावेळी दोन किलोपेक्षा अधिक खाद्य खात नाही.

त्यामुळे बिबट्याने वीसपेक्षा अधिक कोंबड्या एकाचवेळी फस्त केल्या ही चर्चा निरर्थक ठरते, असे वनविभागाचे म्हणणे आहे. घटनास्थळी तसे काही पुरावेही आढळलेले नाही. एकावेळेचे बिबट्याचे खाद्य दोन किलोपेक्षा जास्त नसल्यामुळे जर दीड वर्ष वाढ झालेली बिबट्याची मादी एक बोकड आणि वीसपेक्षा अधिक कोंबड्या खाऊ शकली तर ते खाद्य तिच्यासाठी धोक्याचे ठरू शकते, असे वनविभागाचे म्हणणे आहे. नागरिकांनी अफवा पसरविल्यामुळे अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते. याबाबत वनविभागाकडून बिबट्याच्या शिकारीची पध्दत व खाद्याची क्षमता आदि माहिती जाणून घेतली असता, वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे निदर्शनास आले.----कोंबड्याच्या खुराड्यात हौशेपोटी दहा ते पंधरा कोंबड्या पाळण्यात आल्या होत्या. यापैकी दोन ते तीन कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. तसेच एका लहान बोकडावरही बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याने वीस किंवा ऐंशी कोंबड्या व बोकड खाल्ला या अफवा आहेत. जेरबंद करण्यात आलेली बिबट्याची मादी एक ते दीड वर्षाची आहे, तिचे खाद्य एवढे नसून तीने एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्या व बोकड फस्त केला असता तर ते कदाचित तिच्या जीवावर बेतले असते; मात्र नैसर्गिकरित्या एकाच वेळी बिबट्या एवढे खाद्य खात नाही.- सुनील वाडेकर, रेस्क्यू पथक प्रमुख तथा वनपरिक्षेत्र अधिकारी