शल्यचिकित्सकांनी जाणून घेतले एण्डोस्कोपीतील बारकावे

By Admin | Updated: July 30, 2014 00:22 IST2014-07-29T23:10:08+5:302014-07-30T00:22:21+5:30

शल्यचिकित्सकांनी जाणून घेतले एण्डोस्कोपीतील बारकावे

Surgeons have learned about endoscopy | शल्यचिकित्सकांनी जाणून घेतले एण्डोस्कोपीतील बारकावे

शल्यचिकित्सकांनी जाणून घेतले एण्डोस्कोपीतील बारकावे

नाशिक : एण्डोस्कोपीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहत या शस्त्रक्रियेतील अडचणी व बारकावे नाशिक विभागातील शल्यचिकित्सकांनी जाणून घेतले़
गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे महाराष्ट्र सर्जन असोसिएशनचे डॉ़ प्रकाश जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेस प्रारंभ झाला़ कार्यशाळेत एण्डोस्कोपिस्ट डॉ़ अमोल बापये यांनी कौशल्य हॉस्पिटल येथे रुग्णावर एण्डोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करत त्याची प्रात्यक्षिके दाखवली़ त्यांना डॉ़ अद्वय अहेर यांनी सहकार्य केले़ या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण कुसुमाग्रज स्मारकात करण्यात आले होते़ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ प्रमोद शिंदे यांनी पित्ताशयावरील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याची प्रात्यक्षिके दाखवली़ पहिल्या चर्चासत्रात डॉ. बापये यांच्यासह डॉ़ राजेंद्र पुजारी, डॉ़ रमेश पाटील, डॉ़ प्रमोद शिंदे, डॉ़ अद्वय अहेर, डॉ़ प्रकाश जोशी, डॉ़ सुधीर भामरे यांनी सहभाग घेत एण्डोस्कोपीवर चर्चा केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Surgeons have learned about endoscopy