शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

अंतिम परीक्षांबाबत मासू सर्वोच्च न्यायालयात; हस्तक्षेप याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 4:55 PM

पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी, म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून, या सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांची बाजू  मांडण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन’ने (मासू) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र स्टूडंट युनियनची हस्तक्षेप याचिका अंतीम परीक्षासंदर्भात मासूकडून याचिका दाखल

नाशिक : राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी, म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून, या सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांची बाजू  मांडण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन’ने (मासू) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांविरोधात विविध राज्यांतील विद्यार्थी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.  या याचिकांसदर्भात १० ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करण्यात येऊ नये याकरिता सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासू) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या हस्तक्षेप याचिकेद्वारे सध्याची करोनाची वस्तुस्थिती, आकडेवारी व संशोधन सादर करण्यात आले असून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून मासूने केलेले सर्वेक्षणही सादर केले आहे. तसेच या विषयावरील सर्व माहिती व संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी केलेले पत्रव्यवहारही याचिकेद्वारे सादर केले आहेत. मासूने हस्तक्षेप याचिकेच्या माध्यमातून सद्यपरिस्थितीत आणि पुढील अनिश्चितता यामुळे विद्यापीठ परीक्षा घ्यायची की नाही हा निर्णय संबंधित राज्यांकडेच ठेवण्याची मागणी के ल्याची माहिती मासूतर्फे देण्यात आली असून, देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष या सुनावणीकडे लक्ष लागलेले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय