Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:51 IST2026-04-06T14:49:38+5:302026-04-06T14:51:05+5:30
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कुटुंबावर पाळत ठेवण्यात एसआयटीला सपशेल अपयश आले असताना भोंदू अशोक खरातचे काही भक्त, परिचित तसेच खरातचा मुलगा हर्षवर्धन याच्या मित्रांनी मात्र मजबूत नेटवर्क उभे केले आहे.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
भोंदू अशोक खरातच्या कुटुंबावर पाळत ठेवण्यात एसआयटीला सपशेल अपयश आले असताना भोंदू अशोक खरातचे काही भक्त, परिचित तसेच खरातचा मुलगा हर्षवर्धन याच्या मित्रांनी मात्र मजबूत नेटवर्क उभे केले आहे. खरात याच्या कर्मयोगीनगरातील 'तृप्तबाला' या बंगल्याबाहेर बारकाईने लक्ष असल्याचे दिसून आले. यासाठी त्यांच्याकडून राबविलेली जात असलेली 'मोडस ऑपरेंडी' एसआयटीला देखील चक्रावून सोडणारी आहे.
सध्या खरातच्या घरी सुमसाम परिस्थिती असून, खरातच्या तपासासाठी दिवसभरात कोण कोण येतं, कुटुंबाची माहिती घेण्यास दिवसभरात कोण येतं यावर खरातच्या परिचितांचे लक्ष आहे. 'तृप्तबाला' वर लक्ष ठेवण्यासाठी खरातच्या भक्तांची 'मोडस ऑपरेंडी' असल्यानेच कल्पना खरात तपास पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाल्या होत्या.
राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
खरात कुटुंबीयांना देतात माहिती
कोणी तेथे अनोळखी व्यक्ती तपासासाठी किंवा काही माहिती घेण्यासाठी गेल्यावर काही वेळातच दोघे, तिघे तेथे दुचाकीने येतात अन् काय काम आहे म्हणून विचारणा करतात किंवा तेथे बाहेर असलेला सुरक्षारक्षक लगेचच कोणीतरी आल्याची माहिती बंगल्यात उपस्थित असलेल्या खरात कुटुंबीयांना देतं व मग सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाते किंवा बंगल्याबाहेर असलेला खासगी सुरक्षारक्षक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यच खरातच्या बंगल्यापर्यंत जाण्याअगोदरच कुठून आलात, काय काम आहे, अशी विचारणा करून रोखतात. मात्र खरातबाबत त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला माहीत नाही, बंगल्यात कोणी नाही, असे सांगतात.
"कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
खरातची पत्नी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार
अशोक खरात तसेच त्याची पत्नी कल्पना हिच्यापासून आम्हाला काहीच त्रास झाला नाही. उलट त्यांचे बोलणे आमच्याशी चांगलेच असायचे, आम्हाला अशोक खरात याच्याबद्दल कधीच काहीच संशय आला नाही, असे त्यांनी सांगितले. तर खरातच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांकडे माहिती घेतली असता कोणी काहीच माहिती सांगत नाही. गेल्या चार दिवसांपासून 'तुप्तबाला' या बंगल्यात खरातची मुलगी तसेच एक वृद्ध महिलाच वास्तव्यास आहे. खरातची पत्नी कल्पना ही शिर्डीत एक गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाली असून अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन यास एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशी करून त्यास सोडून देण्यात आले.
भोंदू खरातने पुण्यात मुलीच्या नावे १ कोटी ३० लाखांचा घेतला फ्लॅट; कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघड
हर्षवर्धन नॉट रिचेबलची चर्चा
भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनदेखील घरी आढळून आला नाही. तो एसआयटी पथकास काहीएक न कळविता घरातून गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा फोनही 'नॉट रिचेबल' आहे. या संदर्भात तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता हर्षवर्धन असाही पुण्यातच राहत असे. तो दोन दिवसांपूर्वीच पुण्याला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती एसआयटीकडून मात्र मिळू शकली नाही.