शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागातील गावांना विहिरींचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:30 IST

देवळा (संजय देवरे) तालुक्याची भौगोलिकस्थिती पाहता उत्तरेकडे गिरणा नदीचा काठ मध्ये गिरणा उजवा कालवा व दक्षिणेला चणकापूर उजवा कालवा असे पूर्व-पश्चिम तीन भाग पडतात. बहुतांश पाणी योजना गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गिरणा नदीला व उजव्या कालव्याला येणाऱ्या आवर्तनावर तालुक्याचा बहुतांश भाग अवलंबून आहे.

देवळा (संजय देवरे) तालुक्याची भौगोलिकस्थिती पाहता उत्तरेकडे गिरणा नदीचा काठ मध्ये गिरणा उजवा कालवा व दक्षिणेला चणकापूर उजवा कालवा असे पूर्व-पश्चिम तीन भाग पडतात. बहुतांश पाणी योजना गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गिरणा नदीला व उजव्या कालव्याला येणाऱ्या आवर्तनावर तालुक्याचा बहुतांश भाग अवलंबून आहे. दरम्यान, तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांना धरणे कोरडी पडल्यामुळे अधिग्रहित केलेल्या विहिरींनी आधार दिलेला आहे.तालुक्यात उमराणे येथील परसूल धरण तसेच रामेश्वर येथील किशोरसागर धरणात सध्या पाण्याचा साठा असल्याने या धरणातील नळ पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू आहेत. चणकापूर उजव्या कालव्याला व त्याच्या वितरिकांना नुकतेच चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाºया गावांतील पाणीटंचाई दूर झाली आहे. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची धग जाणवत नाही.देवळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खर्डा, कनकापूर, शेरी, वार्शी, मुलूकवाडी, कांचणे, हनुमंतपाडा आदी गावांना चणकापूर उजव्या कालव्याचा कोणताही लाभ होत नाही. त्या भागात असलेले वार्शी व कनकापूर धरण कोरडे पडले आहे.देवळा शहरासाठी गिरणा नदीपात्रातून सामुदायिक पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या देवळा, सरस्वतीवाडी, माळवाडी, फुले माळवाडी, विजयनगर, खुंटेवाडी, श्रीरामपूर, खालप या गावांना गिरणा नदीला आवर्तन सोडले जाते, त्यावेळी पाणीपुरवठा सुरळीत असतो. गिरणे ला सोडण्यात येणाºया आवर्तनावर ही योजना अवलंबून आहे. आवर्तन बंद झाले की योजना ठप्प होते व शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गिरणा नदीला सोडण्यात येणाºया आवर्तनांच्या मधील काळात नदीपात्रातील उद्भव विहिरी आटल्यानंतर नगरपंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. त्या काळात लोहोणेर येथील बापू अहिरराव, देवीदास धामणे, अशोक धामणे, प्रल्हाद बागुल आदी शेतकरी त्यांच्या विहिरीतील व बोअरवेलचे पाणी देऊन सहकार्य करत असल्यामुळे टंचाई काळातही शहराला पाणीपुरवठा सुरू आहे.----------कोरोनामुळे योजना खोळंबलीरामेश्वर धरणातून महाराष्ट्र नगरोत्थान अभियानातून देवळा शहरासाठी साडेनऊ कोटी रुपयांच्या थेट पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना पूर्ण झाल्यास देवळा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रामेश्वर धरणात पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण होऊन वर्षभर वेळोवेळी पाण्याचे नियमित आवर्तन मिळेल. त्यामुळे धरण व कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना व वरवंडी, मटाणे, वाजगाव, रामेश्वर आदी गावांनादेखील याचा लाभ होऊन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही; परंतु कोरोना महामारीमुळे योजना खोळंबली असल्याची माहिती नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर यांनी दिली.

 

 

टॅग्स :Nashikनाशिक