नाशिक : येथील पोलीस मुख्यालय वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या राहत्या घरी पोलीस शिपाई राकेश बापू सोनवणे (३०) यांनी सोमवारी (दि.२४) गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनवणे यांच्या आत्महत्त्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ते मुंबई येथील नायगाव येथे पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत होते. नाशिक येथे सोनवणे रजेवर आले होते.
पोलीसाची गळफास घेऊन आत्महत्त्या
By admin | Updated: April 24, 2017 20:18 IST