पंचवटी : जेलरोड परिसरात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय इसमाने आडगाव शिवारात गोदावरी नदीवरील दसक पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) घडली. ही घटना दुपारच्या सुमाराला उघडकीस आल्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष अरुण काळे असे पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करणाºया इसमाचे नाव आहे. काळे याने गुरुवारी दुपारच्या सुमारास दसक येथील गोदावरी नदी पुलावरून पाण्यात उडी मारली होती. परिसरातील नागरिकांच्या ही घटना निदर्शनास येताच काही जणांनी एकत्र येत त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉ. शरद पाटील यांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेमुळे जेलरोड परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणाचा सहायक पोलीस उपनिरीक्षक खालकर तपास करीत आहेत.
दसक पुलावरून उडी मारून एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:42 IST