Suicide of a farmer of Talwade Digar | तळवाडे दिगरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

तळवाडे दिगरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

सटाणा/तळवाडे दिगर : कर्जाला कंटाळून तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) उघडकीस आली. 
सुनील बाळू पगार(४२) यांची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी शेतीवर बँकेचे व्याजासह २१ लाख तर बँकेकडून ५ लाखाचे कर्ज घेतले होते, संकटांना तोंड देत शेतीचा गाडा ओढत होते. शेतातील टरबूज फवारणीसाठी ते शेतात गेले असता,  झाडास गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ग्रामस्थांनी आत्महत्येची माहिती सटाणा पोलीस ठाण्यास कळविली.

Web Title: Suicide of a farmer of Talwade Digar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.