शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

पोलीस साडूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 1:30 AM

जुन्या नाशकातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमवाडी भागात एका सराईत गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी भागात एका पोलीस साडू आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून जीवनप्रवास संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देदुसरी घटना : सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

पंचवटी : जुन्या नाशकातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमवाडी भागात एका सराईत गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी भागात एका पोलीस साडू आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून जीवनप्रवास संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई संशयित मनोज खैरे यांच्यासह त्यांच्या सासरच्या अन्य काही लोकांच्या  छळाला कंटाळून त्यांचा साडू कुणाल विलास गायकवाड (३४, रा. त्र्यंबकनगर, हिरावाडी) यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मयत कुणाल याचा भाऊ योगश विलास गायकवाड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित पोलीस मनोज खैरे यांच्यासह सोनाली सोनवणे, ज्योती खैरे, वृषाली महाजन, रमेश त्र्यंबक निकम व माणिक महाजन या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  त्यासंबंधी ध्वनी व चित्रफितीचा पुरावा असल्याचे  सांगून ‘आमचे पैसे आणि बहिणीचे दागिने परत कर नाही तर पुन्हा तुला जेलमध्ये पाठवू’ अशी धमकी संशयितांनी एका नातेवाइकाच्या विवाहात दिल्याचेही योगेशने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धमक्या व दमदाटी होत असल्याची तक्रारचार महिन्यांपूर्वी कुणाल गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती. यामुळे सासरच्या मंडळीने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांना न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला होता. साडू मनोज खैरे आणि अन्य संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधत कुणालकडे मोठी आर्थिक मागणी करून तसेच धमक्या व दमदाटी करून आपल्या भावास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे योगेश याने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू