शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सीआयआयच्या अध्यक्षपदी सुधीर मुतालिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST

सीआयआय महाराष्ट्राची सर्वसाधारण घेण्यात आली. यात विद्यमान उपाध्यक्ष सुधीर मुतालिक यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे श्रीराम नारायणन यांची निवड ...

सीआयआय महाराष्ट्राची सर्वसाधारण घेण्यात आली. यात विद्यमान उपाध्यक्ष सुधीर मुतालिक यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे श्रीराम नारायणन यांची निवड करण्यात आली. मुतालिक यांनी यापूर्वी सीआयआय नाशिकचे अध्यक्षपद भूषविले आहे.तसेच विविध संस्थांवर ते कार्यरत आहेत. मावळते अध्यक्ष तथा टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक अरविंद गोयल यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे मुतालिक यांनी स्वीकारली. आगामी काळात उद्योगांशी संबंधित धोरणांच्या बाबतीत सरकारशी चर्चा करणे, उद्योगांना स्पर्धात्मक बनण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, विशेषत: व्यवसायातील उत्कृष्टतेसाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांवर लक्ष केंद्रित करणे, उद्योजकांच्या विकासासाठी विशेष क्लस्टर तयार करणे व डिजिटलायझेशन आणि इंडस्ट्री ४.० च्या दिशेने विशेष अंमलबजावणी करणे, कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे यावर भर दिला जाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी लोकमतशी बोलताना दिली.

१८९५ मध्ये स्थापन झालेल्या सीआयआय ही संस्था उद्योग आणि सरकार भागीदार म्हणून अनुकूल वातावरण तयार करून ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीआयआय ही एक अशासकीय उद्योग विकास व व्यवस्थापनात एक अग्रगण्य संस्था आहे.

===Photopath===

040321\04nsk_35_04032021_13.jpg

===Caption===

सुधीर मुतालीक