उपनगरला वृद्धेचे मंगळसूत्र खेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:24 IST2018-07-21T16:15:57+5:302018-07-21T16:24:47+5:30
नाशिक : मुलासोबत पायी जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील पाउण लाखाचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) दुपारी उपनगरच्या कन्हैया स्वीटजवळ घडली़

उपनगरला वृद्धेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : मुलासोबत पायी जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील पाउण लाखाचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) दुपारी उपनगरच्या कन्हैया स्वीटजवळ घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रहिवासी हर्षा दत्तात्रय बारगजे (६१, अक्षरधारा अपार्टमेंट, उपनगर) या दुपारी सव्वादोन ते अडीच वाजेच्या सुमारास आपल्या मुलासह उपनगरजवळील कन्हैया स्वीटजवळून पायी जात होत्या़ यावेळी पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने बारगजे यांना जोराचा धक्का देत त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़
या प्रकरणी बारगजे यांच्या फिर्यादीनुसार दोन संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़