वडनेर भैरव महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली हरित शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:42 PM2021-02-13T23:42:55+5:302021-02-14T00:30:04+5:30

वडनेरभैरव : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ह्यहरित शपथह्ण घेतली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पर्यावरण शास्र विभाग यांनी हा उपक्रम आयोजित केला होता.

Students take green oath at Wadner Bhairav College | वडनेर भैरव महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली हरित शपथ

वडनेर भैरव महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली हरित शपथ

Next
ठळक मुद्देप्राचार्य भगत यांनी ही मार्गदर्शन केले.

वडनेरभैरव : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ह्यहरित शपथह्ण घेतली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पर्यावरण शास्र विभाग यांनी हा उपक्रम आयोजित केला होता.

प्राचार्य ए. एल. भगत तसेच ग्रामसेवक आर. बी. सूर्यवंशी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्राचार्य भगत यांनी ही मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण व संवर्धनसंदर्भात हरित शपथ घेतली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी शासकीय पोर्टलवरूनसुद्धा हरित शपथ उपक्रमात सहभागी नोंदविला. कार्यक्रमाला उपप्राचार्य एन. डी. वडघुले, प्रा. प्रमोद निकम, प्रा. भीमराज गायकवाड, प्रा. समाधान वायकांडे, प्रा. सुनील कुमावत सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. प्रा. ज्ञानेश्वर भगुरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विठ्ठल जाधव यांनी आभार मानले. 

Web Title: Students take green oath at Wadner Bhairav College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.