शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना भविष्याचा विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:27 IST

तळमळीने व चिकाटीने कार्य करणाऱ्या तीन पिढ्यांच्या योगदानामुळे दुर्गम आदिवासी भागातील एक शैक्षणिक कार्य उभी करणारी संस्था म्हणजे डांग सेवा मंडळ संस्था आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत यांनी केले.

ठळक मुद्देश्रीराम गीत : दादासाहेब बिडकर स्मृती अभिवादन

पंचवटी : तळमळीने व चिकाटीने कार्य करणाऱ्या तीन पिढ्यांच्या योगदानामुळे दुर्गम आदिवासी भागातील एक शैक्षणिक कार्य उभी करणारी संस्था म्हणजे डांग सेवा मंडळ संस्था आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत यांनी केले. दिंडोरीरोडवरील नाथकृपा लॉन्स येथे डांग सेवा मंडळ यांच्या वतीने स्व. दादासाहेब बिडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिवादन, चरित्र ग्रंथ प्रकाशन व पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी गीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर तांबे, राजहंस प्रकाशनचे प्रकाशक दिलीप माजगावकर, विनया खडपेकर, मनोजकुमार देशमुख, अनिल देठणकर, मनोज तिबडेवाला आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गीत यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या अपेक्षा काय शिकायचे, कधी शिकायचे आणि शिक्षण घेऊन काय करायचे याबाबत भविष्याचा विचार करावा तसेच कौशल्य विकास व आपल्या चुका सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे, असे सांगून नेमके बोलणे नियोजित बोलणे याविषयी मार्गदर्शन केले.व्यासपीठावरून बोलताना खडपेकर यांनी संस्थेने व संस्थाचालकांनी केलेल्या कार्याची फक्त दखल न घेता त्यांच्यातील चिकाटी हा गुण त्यांनी आदिवासींच्या शिक्षण व आरोग्य सेवेला वाहून घेतला आहे. आज पुढची पिढी हा सेवेचा वसा संस्था पुढे नेत आहे. संस्थेला शासनाचे अनुदान मिळते, परंतु संस्थेच्या कार्याचा व्याप अतिशय कष्टप्रद व खर्चिकआहे.यावेळी दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. नरेंद्र पाटील, बी. आर. भामरे, पी. पी. जाधव, अनिल घरटे, आर. पी. पगारे, यमुनाबाई मोरे, नाना बागुल, कलाबाई मालखेडे आदींना मान्यवरांच्या हस्ते आदर्श सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्रीमती हेमलता बिडकर यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या शुभम पवार, अमिषा पेठकर, प्रतीक पवार, योगीता ब्राह्मणे, भागवत वार्डे, लता कुरकुते, नूतन भोये, अश्विनी भालेराव अशा २८ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्र माप्रसंगी श्रीमती मृणाल जोशी, अण्णासाहेब मराठे, दामू ठाकरे, प्रभाकर पवार, पीयूष पारेख, लक्ष्मण ठाकरे, रवींद्र जाधव, कमलेश शेलार, विलास खैरनार, जितेंद्र सूर्यवंशी, किसन बागुल, आदींसह संस्थेचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले.दिलीप माजगावकर यांनी संस्थाचालक व संस्थेला शासनाने व विद्यापीठाने तसेच विविध संस्थांचे मिळालेले पुरस्कार आणि दादासाहेबांच्या कार्य व कर्तृत्वाबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. तसेच चांगल्या कार्याला सहकार्याचा हात अपेक्षित असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितल.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र