अमृत कळमकर ।लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : ग्रामीण भागात प्राथमिक शाळा बंद असल्याने रानातच गोशाळा सुरू झाली असून विद्यार्थी सध्या गुराख्याची भूमिका बजावत आहेत. शेतकऱ्यांची मुले आता आपल्या आई-वडिलांना कामात मदत करीत त्यांच्यावरचा भार हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचेही पालकांकडून बोलले जात आहे.दरवर्षी १५ जूनला शाळा सुरू होतात मात्र यावर्षी १५ आॅगस्टपर्यंत शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळविला आहे. शेतातील महत्त्वाचे काम आता सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. कांदा लागवड तसेच पुढील महिन्यात कापसाची वेचणी सुरू होणार असून विद्यार्थी शेतीकामात रमले आहेत. शेतातील इतर कामांबरोबरच शेतकऱ्यांकडे असणारी गुरे चारण्यासाठी माणसाच्या आवश्यकता असते. त्यामुळे घरातील कोणीतरी व्यक्तीच गुरे चारण्यासाठी जात आहेत.मात्र सद्यस्थितीत घरात दोन- तीन विद्यार्थी उपलब्ध असल्याने मजुरांची टंचाई भासत नाही. शेतकºयांना शाळा बंद असल्याचा फायदा होत असला तरी विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकºयांकडून दुग्ध व्यवसाय केला जातो. त्यासाठी गायी, म्हैस, बैल आदी जनावरे पाळलेली असतात. पावसाळ्यात त्यांना खाण्यासाठी चारा उपलब्ध नसतो. त्यामुळे गुरे चारण्यासाठी मुले जात आहेत.एकत्र खेळण्यात वेळ जात असला तरी विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे भ्रमणध्वनी उपलब्ध नसल्याने आॅनलाईन अभ्यास करणे गैरसोयीचे झाले आहे. प्राथमिक शाळा बंद असल्याने त्यांचे आॅनलाईन वर्ग बंद आहेत. मात्र त्यापुढील वर्गांचे आॅनलाईन वर्ग सुरू असली तरी काही अॅँड्रॉईड दूरध्वनीअभावी विद्यार्थी पूर्ण अभ्यास मुक्त झाले आहेत. अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असला तरी शिक्षणाची तात्पुरती सोय उपलब्ध नसल्याने शेतकºयांच्या मुलांनी गोशाळा स्वीकारली आहे. शेतीकामासाठी विद्यार्थ्यांचा पालकांना हातभार सध्या श्रावण महिन्यामध्ये ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकºयाला एक-एक माणसाची गरज भासत असल्याने प्रत्येक माणूस कामाला लागला आहे. घरातील म्हातारी माणसे सुद्धा आपापल्या परिने हातभार लावताना दिसून येत आहेत. पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचाही आता पालकांना हातभार लागत आहे. विद्यार्थी या अगोदर शाळेत जात असल्याने शेतकºयांना मजूर लावूनच कामे करावी लागायची.
शाळा बंद झाल्याने विद्यार्थी बनले गुराखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:26 IST
खडकी : ग्रामीण भागात प्राथमिक शाळा बंद असल्याने रानातच गोशाळा सुरू झाली असून विद्यार्थी सध्या गुराख्याची भूमिका बजावत आहेत. शेतकऱ्यांची मुले आता आपल्या आई-वडिलांना कामात मदत करीत त्यांच्यावरचा भार हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचेही पालकांकडून बोलले जात आहे.
शाळा बंद झाल्याने विद्यार्थी बनले गुराखी!
ठळक मुद्देनुकसानीची खंत : अॅँड्रॉइड मोबाईलअभावी आॅनलाईन वर्गासही मुकले