बोरीपाडा आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 00:54 IST2021-12-13T00:53:46+5:302021-12-13T00:54:37+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील नववीतील विद्यार्थिनी रोहिणी बापू वड हिने स्वतःच्या ओढणीने वसतिगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Student commits suicide at Boripada Ashram School | बोरीपाडा आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या

बोरीपाडा आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या

हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील नववीतील विद्यार्थिनी रोहिणी बापू वड हिने स्वतःच्या ओढणीने वसतिगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थी भोजनासाठी गेले. मात्र रोहिणी वड हिने भोजनगृहात न जाता माझ्यासाठी डबा इकडेच घेऊन ये, असे तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले. सर्व विद्यार्थिनी गेल्यानंतर तिने आपल्या स्वतःच्या ओढणीने वसतिगृहातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. भोजन करून आल्यानंतर तिच्या खोलीला आतून कडी लावली असल्याने दरवाजा उघडत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी अधीक्षक यांना त्याची माहिती दिली. अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी कडी तोडून आत प्रवेश केल्यानंतर पंख्यास गळफास लावलेली रोहिणी आढळून आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह हरसूल ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पुढील तपास हरसूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत.

Web Title: Student commits suicide at Boripada Ashram School